MSBSHSE Logo Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education, Pune-411004

Student Fee Refund Portal

Eligibility Criteria

* सन २०२५ मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्ती मुळे सवलती साठी बाधित तालुत्यातील इ.१० वी व इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी बाबत.. *

* का र्य प ध्द ती *

१. दि.१० ऑक्टोबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार जाहीर झालेल्या राज्यामध्ये अतिवृष्टी होवून पुर आपत्ती परिस्थिती उद्भवलेल्या अंशत: बाधित व पूर्णत: बाधित अशा एकूण २८२ तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना ‘माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२६ मधील परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची यादी इ.१०वीसाठी  http://feerefund.mh-ssc.ac.in आणि इ.१२वीसाठी http://feerefund.mh-hsc.ac.in ह्या लिंकवर उपलब्ध करुन दिलेली आहे. सदर लिंक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर http://mahahsscboard.in प्रसिध्द करण्यात आली आहे.

२. सदर लिंकवर पहिल्या रकान्यात विद्यार्थ्यांनी परीक्षा आवेदनपत्रामध्ये सादर केलेल्या माहितीच्या आधारे, माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव व सांकेतिक क्रमांक (Index Number), विद्यार्थ्याचे नाव, विद्यार्थ्याचे गाव, महसूल मंडळ, तालुका, जिल्हा, विद्यार्थ्याचा बैठक क्रमांक, आधार क्रमांक (आधार सलग्न बॅंक खाते असावे) अशी माहिती उपलब्ध करुन दिली आहे.

३. मुख्याध्यापक / प्राचार्य, माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय यांनी दुस-या रकान्यामध्ये नमूद केलेले पाच पात्रता निकष तपासून त्यापुढे बरोबर (√) असे दर्शविल्यानंतरच तो विद्यार्थी ह्या योजनेंतर्गत परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीसाठी पात्र होणार आहे. अन्यथा सदर विद्यार्थी ह्या योजनेंतर्गत परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीसाठी अपात्र ठरणार आहे.

४. पात्र झालेल्या विद्यार्थ्याच्या नावाखाली “Qualify” दर्शविले जाईल. त्यानंतर सदर विद्यार्थ्याची Bank Account ची माहिती भरण्यास रकाने उपलब्ध (enable) केले जातील. याच पध्दतीने सर्व पात्र विद्यार्थ्यांचे निश्चितीकरण करण्यात यावे.ह्या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची सर्व माहिती क्रमाने (खातेदाराचे नाव, खातेदाराचा आधार क्रमांक, खातेदाराचे लाभार्थ्याशी नाते इ.) भरणे आवश्यक आहे.रकान्यातील सर्व माहिती परिपूर्ण / अचूकपणे भरण्यात यावी.

५. सदर योजना स्वयं अर्थसहाय्यीत शाळा वगळता अन्य सर्व म्हणजे शासकीय / खाजगी अनुदानित / विना अनुदानित माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना लागू राहील.

६. अंशतः बाधित लाभार्थ्यांची यादी निकषांप्रमाणे प्रमाणित केल्याच्या कार्यवाहीनंतर ‘मुख्याध्यापक / प्राचार्य’ यांनी स्वाक्षरी upload करावयाची आहे. स्वाक्षरी upload केल्यानंतर submit हे बटन उपलब्ध होईल. त्यानुसार Bank Account चा तपशील प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती निर्धारित दि.------ एप्रिल, २०२६ अखेर ऑनलाईन पध्दतीने राज्यमंडळ, पुणे कार्यालयास सादर (submit) करावयाची आहे. माहीती एकदा submit केल्यानंतर पुन:श्च submit करता येणार नाही. सदर माहिती ऑनलाइन पध्दतीने राज्यमंडळ, पुणे कार्यालयास प्राप्त होणार आहे.

७. परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेंतर्गत सर्व अभिलेख (प्रमाणपत्र व Annexure 'A' 'B') हे संबंधित माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर जतन करण्यात यावेत.

८. परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती ही राज्यमंडळ ,पुणे स्तरावरून NEFT/RTGS द्वारे विद्यार्थ्यांच्या / पालकांच्या आधार सलग्न Bank Account मध्ये वर्ग करण्यात येणार असल्याने, सदर माहिती उपलब्ध न झाल्यास अथवा चुकीची माहिती अथवा चुकीचा Bank Account दिल्यास सदर लाभपासून विद्यार्थी वंचित राहणार असल्याने परिपूर्ण माहिती निर्धारित कलावधीमध्ये भरण्याची दक्षता घेण्यात यावी, ही जबाबदारी पूर्णतः संबंधित मुख्याध्यापक / प्राचार्य यांची राहील.

९. बँक खाते आधार क्रमांकास संलग्न नसल्यास फी प्रतिपूर्तीची रक्कम बँक खात्यावर वर्ग होणार नाही त्यामुळे बॅंक खाते क्रमांकाला आधार संलग्न केलेले असल्याची खात्री आपल्या स्तरावरून काटेकोरपणे करण्यात यावी

१०. सदर योजच्या प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी मुख्याध्यापक / प्राचार्य, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), विभागीय शिक्षण उपसंचालक आणि विभागीय सचिव, विभागीय मंडळ यांनी वैयक्तिक लक्ष घालून विहित कालावधीमध्ये राज्यमंडळ, पुणे या कार्यालयाकडे माहिती सादर करणेबाबत पाठपुरावा करावा.

११. उपरोक्त सर्व माहिती परिपूर्ण / अचूक भरल्याशिवाय पात्र लाभार्थ्यांना परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम बँक खात्यावर ऑनलाईन पध्दतीने वर्ग केली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.